श्री ग्रामदैवत काळभैरवनाथ ग्राम विकास पॅनल चा प्रचाराचा भव्य शुभारंभ हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा नारळ धुमधडाक्यात फुटला.
मान:श्री ग्रामदैवत काळभैरवनाथ ग्राम विकास पॅनल चा प्रचाराचा भव्य शुभारंभ हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा नारळ धुमधडाक्यात फुटला या पॅनलमध्ये गावातील तरुण ज्येष्ठ महिला मंडळ यांची उपस्थिती लक्षणीय होती या पॅनेलला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला यामध्ये ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी अकरा पासून प्रचाराला शुभारंभ झाला विठ्ठल रुक्माई मंदिर समाज मंदिर लक्ष्मीदेवी मंदिर म्हसोबा देवस्थान दत्त मंदिर मोरया मंदिर जय हनुमान मंदिर बापूजी बुवा मंदिर अशा सर्व देवस्थान बुद्ध विहार अशा सर्व धार्मिक स्थळांना उमेदवारांनी दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली यामध्ये सर्व उमेदवार उपस्थित होते उमेदवारांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करून सर्व उमेदवाराचा परिचय सुनील नामदेव भरणे यांनी करून दिला यामध्ये योगिता रामेश्वर पारखी शुभांगी राजेंद्र भोसले प्रशांत(आबा) गुलाब पारखी अर्चना रामेश्वर गवारे महेश पारखी इत्यादी सर्व ग्रामदैवत काळभैरवनाथ पॅनलचे सर्व उमेदवाराला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे गावात एकच चर्चा चौकाचौकात काळभैरवनाथ ग्रामीण विकास पॅनल आघाडीवर असल्याचे गावामध्ये चर्चेला उधाण आले.

