माण गावाचा सर्वांगिन विकास करणार :-प्रशांत (आबा)गुलाब पारखी
मान ग्रामपंचायत:प्रशांत(आबा)गुलाब पारखी मान ग्रामपंचायत निवडणूक क्रमांक एक मधील लोकप्रिय उमेदवार प्रशांत(आबा)गुलाब पारखी हे निवडणूक लढवीत आहे. माझे निवडणूक चिन्ह कप बशी हे असून मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे मला सर्वसामान्याच्या प्रश्नाची चांगल्याप्रकारे जाण आहे .मी गावातील मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये लाईट रस्ते पाणी ड्रेनेज लाईन स्वच्छ पिण्याचे पाणी आणि आरोग्य सेवा यावर विशेष लक्ष देणार आहे तसेच गावामध्ये नैसर्गिक डोंगर लाभला आहे या डोंगर पायथ्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य असे विरंगुळा पार्क निर्माण करण्याचा माझा मानस आहे असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .तसेच गावांमध्ये भाजीमंडई निर्माण करून मजुरांच्या हाताला काम देण्यात माझा विचार आहे आज पारंपरिक खेळ लुप्त होत चालले आहे उदाहरणार्थ कबड्डी मलखांब कुस्ती आखाडा अशा खेळांना प्रतिसाथ देऊन तरुण पिढीला विकासाच्या प्रवाहात मी आणणार आहे तसेच गावांमध्ये डिजिटल ग्रंथालय निर्माण करणार आहे . कंपनीमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी मी आग्रह धरणार आहे .तसेच महिला मंडळाच्या माध्यमातून बचत गट निर्माण करून वार्डातील महिलांना त्यांच्या हाताला काम मिळवून देणारा आहे तसेच एक सुसज्ज हॉस्पिटल निर्माण व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे .तरी सुजान नागरिक बंधू आणि भगिनींना श्री ग्रामदैवत काळभैरवनाथ ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवाराला मतदान रुपी आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजय करून समाज सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती करतो.

