महिलांना आत्मनिर्भर करणार:- सौ. आरती प्रवीण वाघमारे
सौ.आरती प्रवीण वाघमारे वार्ड क्रमांक तीन मधील लोकप्रिय उमेदवार तरुण तडफदार सुशिक्षित लोकप्रिय उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यमान सरपंच प्रवीण वाघमारे यांच्या त्या पत्नी असून यांनी हिंजवडी ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामे केली आहेत .त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मी सर्वांगीण वार्डाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे .मी या निवडणुकीत श्री म्हातोबा ग्रामविकास पॅनल च्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे मी सर्वसामान्य कुटुंबातील महिला असल्यामुळे मला तळागाळातील लोकांच्या प्रश्नाची जाण आहे. सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून मी वार्डाच्या विकास करणार आहे .मूलभूत सुविधा वर मी विशेष भर देणार आहे यामध्ये रस्ता लाईट पाणी ड्रेनेज लाईन आणि आरोग्य सेवा यावर मी विशेष लक्ष केंद्रित करणार आहे . महिला बचत गटाच्या पायावर उभे करणार आहे. तरी सुजान मतदार बंधू-भगिनींना नम्र विनंती करते की पॅनल च्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करून समाज सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती करते

