वॉर्डाचा विकास हाच ध्यास :-श्री विलास विठ्ठल साखरे
हिंजवडी: विलास विठ्ठल साखरे हिंजवडी ग्रामपंचायत निवडणूक मधील वार्ड क्रमांक पाच मधील लोकप्रिय कार्यक्षम सुसक्षित उमेदवार म्हणून विलास विठ्ठल साखरे यांच्याकडे पाहिले जाते माझे निवडणूक चिन्ह नारळ हे आहे .मी गेल्या चार पाच वर्षापासून सार्वजनिक जयंती उत्सव गणेश मंडळाच्या माध्यमातून समाजसेवा करत आहे .वार्डातील ज्येष्ठ व तरुणांच्या आग्रहास्तव मी निवडणूक लढवत आहे .मी सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असल्यामुळे वार्डातील नागरिकांच्या प्रश्नांची मला जाण आहे .मी सर्वप्रथम वार्डातील मूलभूत सुविधा सोडवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करणार आहे यामध्ये लाईट रस्ते ड्रेनेज लाईन पिण्याचे स्वच्छ पाणी आणि आरोग्य सेवा यावर विशेष भर देणार आहे. कंपनीमध्ये गावातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी मी आग्रह धरणार आहे .मी कोणतेही गटातटाचे राजकारण न करता वार्डातील सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे .ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा पार्क निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे .तरी सुजान मतदार बंधू-भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की ग्रामदैवत श्री म्हातोबा परिवर्तन पॅनल च्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून समाज सेवा करण्याची संधी द्यावी ही मी नम्र विनंती करतो.

