वॉर्डाचा चौफेर विकास करणार :-सौ .प्रतीक्षा शिवाजी घोटकुले (जांभुळकर)
हिंजवडी:-सौ .प्रतीक्षा शिवाजी घोटकुले (जांभुळकर) हिंजवडी ग्रामपंचायत निवडणूक वार्ड क्रमांक तीन मधील सुसंस्कृत अभ्यासू सुसक्षित लोकप्रिय महिला उमेदवार म्हणून सौ प्रतिक्षा शिवाजी घोटकुळे (जांभुळकर )ह्या परिचित आहेत .ग्रामदैवत श्री म्हातोबा परिवर्तन पॅनलच्या वतीने त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत ."जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी" या म्हणीप्रमाणे अशा अभ्यासू व्यक्तीमत्वाच्या महिलांना समाज सेवा करण्याची संधी दिल्यास संधीचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रामपातळीवर स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे .शासनाच्या विविध योजना त्यामध्ये विधवा महिला ,श्रावण बाळ योजना, निराधार योजना ,रमाई घरकुल आवास योजना इत्यादी योजना राबवून वार्डाचा चौफेर विकास केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग ,कुटीर उद्योग, टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवणे असे विविध उपक्रम राबवून महिलांना मी स्वयंपूर्ण बनवून त्यांना मी आत्मनिर्भर करणार आहे. तरी सुजान नागरिक बंधू-भगिनींनी वार्ड क्रमांक तीन मधील सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून समाज सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती करते

