जनसेवक म्हणून काम करणार :- विशाल लक्ष्मण साखरे
हिंजवडी:विशाल लक्ष्मण साखरे हिंजवडी ग्रामपंचायत निवडणूक वार्ड क्रमांक तीन मधील लोकप्रिय उमेदवार श्री विशाल लक्ष्मण साखरे हे सर्वत्र परिचित आहेत. हिंजवडी गाव मध्ये रस्ते ,ड्रेनेज ,लाईट, पिण्याचे पाणी ,स्वच्छता ,घनकचरा व्यवस्थापन इत्यादी कामावर मी लक्ष केंद्रित करणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र निर्माण करण्याचा माझा मानस आहे. हिंजवडी आयटी नगरीत सुसज्ज असे भाजी मंडई निर्माण करणार आहे .मी कोणत्याही गटातटाचे राजकारण न करता विविध विकास कामे करून वडाचा चौफेर विकास करणार आहे .सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून मी पुढील वाटचाल करणार आहे .बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम देऊन महिला सक्षमीकरणाच्या प्रवाहात आणणार आहे .स्थानिक तरुणांना कंपनीमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी मी आग्रही राहणार असून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि प्रमाणिक प्रयत्न करणार आहे .तरी सुजान मतदार बंधू-भगिनींनी आपले अमूल्य मत देऊन समाजसेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती

