वॉर्डाचा विकास हाच ध्यास:-ऐश्वर्या प्रशांत वाघमारे
हिंजवडी: सौ.ऐश्वर्या प्रशांत वाघमारे ह्या सुसंस्कृत अभ्यासू आणि लोकप्रिय उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते .मी महिला मंडळाचे अध्यक्ष असून महिलांच्या हाताला काम देण्यासाठी मी लघुउद्योग कुटिर उद्योग आणि टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवणे असे वेगवेगळे उपक्रम राबवून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न मी केला आहे .महिला ह्या चूल आणि मूल इथे पर्यंतच मर्यादित न राहता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तरी सुजाण नागरिकांनी मतदान रुपी आशीर्वाद देऊन प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करून समाज सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती.

