मूलभूत सुविधा वर भर देणार :-शुभांगी सुरज साखरे
हिंजवडी:सौ .शुभांगी सुरज साखरे वार्ड क्रमांक पाच मधील लोकप्रिय उमेदवार सौ सुभांगी सुरज साखरे ग्रामदैवत श्री म्हातोबा परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून मी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे .मला समाजसेवा करण्याची आवड आहे .त्यामुळे वार्डातील महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या विनंतीवरून मी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे .वार्डातील मूलभूत सुविधा वर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे .त्यामध्ये रस्ते ड्रेनेज लाईन स्वच्छ पिण्याचे पाणी लाईट घनचक्कर आ व्यवस्थापन आणि आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रमाणिक प्रयत्न करणार आहे . निराधार योजना श्रावण बाळ योजना, रमाई आवास घरकुल योजना ,तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळातील महिला पर्यंत पोहोचवण्याचा मी प्रमाणिक प्रयत्न करणार आहे तरी वार्डातील मतदार बंधू-भगिणीनी वार्ड क्रमांक पाच मधील सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करून समाज सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती करते

