जनसेवा ग्रामविकास पॅनेल च्या प्रचार शुभारंभ ला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जनसेवा ग्रामविकास पॅनल चा प्रचार शुभारंभ ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. यामध्ये अनिल लक्ष्मण पारखी ,सौ सारिका सतीश भोसले ,आणि मेघा संजय मारणे या उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की कोणत्याही भूलथापांना आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करून जनसेवा ग्रामविकास पॅनल च्या सर्व उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करावे असे त्यांनी आव्हान केले. याला महिला आणि तरुणांनी मोठ्याने टाळ्या वाजून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला पॅनल मधील सर्व उमेदवार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व गावाच्या भल्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

