देशात सध्या सर्वच काही माझ्या हाती असं वातावरण असताना आपण राज्यात केंद्रीकरणावर भर देत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला
मुंबई: देशात सध्या सर्वच काही माझ्या हाती असं वातावरण असताना आपण राज्यात केंद्रीकरणावर भर देत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. नागपूरकरांशी संवाद साधत असताना ठाकरे यांनी हा टोला लगावला. त्यावेळी मध्येच माईकचा आवाज बंद झाल्याने नागपूरवाले मला म्यूट का करत आहे? असा मिश्किल सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.
नागपूरमधील नव्या विधीमंडळाच्या इमारतीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोले लगावले. सध्या देशात माझ्याच हाती सर्व काही असं वातावरण आहे. असं असतानाही महाराष्ट्र मात्र केंद्रीकरणावर भर देत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काम करत आहे. विधीमंडळ इमारतीचं ऑनलाईनपद्धतीने होणारं उद्घाटनही त्याचाच एक भाग आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा नागपूरकरांशी हा संवाद सुरू असताना तांत्रिक कारणामुळे मध्येच माईक बंद झाला. तेव्हा नागपूरवाले मला मध्येच का म्यूट करत आहे, असा मिश्किल सवाल करत मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं.

