बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे. आज दुपारी 1 वाजता गांगुलीच्या प्रकृतीबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI President) अध्यक्ष सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) प्रकृती आता स्थिर आहे. गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला होता. यानंतर गांगुलीला कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात (Woodlands Hospital) दाखल करण्यात आले होते. दरम्यान यानंतर गांगुलीवर अॅंजियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान अनेक ब्लॉकेज काढण्यात आले आहेत. तसेच गांगुलीचा आधीपेक्षा ऑक्सीजनचा स्तर वाढला आहे. यामुळे गांगुलीला देण्यात आलेला ऑक्सिजन सपोर्ट काढण्यात आला आहे. दरम्यान गांगुलीच्या प्रकृतीबाबत पुढील माहिती आज दुपारी (3 जानेवारी) 1 वाजता देण्यात येणार आहे. वुडलॅंड्स रुग्णालयकडून 1 वाजता मेडिकल बुलेटिन घेण्यात (Sourav Ganguly medical bulletin)येणार आहे. याद्वारे गांगुलीच्या प्रकृतीची माहिती दिली जाणार आहे.

