जनतेचा सेवक म्हणून काम करणार विजय भोसले...
मान:जनतेचा सेवक म्हणून काम करणार विजय कैलास भोसले मान ग्रामपंचायत निवडणूक 2021 प्रभाग क्रमांक 4 मधून मी निवडणूक लढवीत आहे माझे आजोबा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात आल्यामुळे माझ्या घराण्यावर छत्रपती शिवाजी महाराज ,राजश्री शाहू महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आणि पगडा आहे .त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मी समाजसेवेचा ध्यास घेतला आहे .मान ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मी सुजाण नागरिकांना विनंती करू इच्छितो की एक स्वच्छ आणि सुंदर वार्ड निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे .वार्डातील रस्ते पाणी ड्रेनेज लाईट आरोग्य इत्यादी मूलभूत गरजा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जेष्ठ व तरुण मंडळींनी माझ्या नावाचा आग्रह धरल्यामुळे मी आपल्यापुढे निवडणुकीसाठी उभा आहे शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी मी त्यांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करणार आहे .तरी सुजाण नागरिकांनी मतदान रुपी आशीर्वाद देऊन मला निवडून द्यावे ही नम्र विनंती धन्यवाद.

