बहुजन समाज पार्टीच्या वतीने चंद्रपूर मनपा आयुक्तांना निवेदन सादर
चंद्रपूर:बहुजन समाज पार्टी चंद्रपूर शहर शाखेच्या वतीने बहुजन समाज पार्टीचे गटनेता तथा नगरसेवक अनिल रामटेके यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महानगरपालिकेचे सन्माननीय उपायुक्त वाघ साहेब यांना अंचलेश्वर गेट ते महात्मा फुले चौक बाबुपेठ तथा बागला चौक ते राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पर्यंतच्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना, वाहनचालकांना खूप त्रास होत असून दुर्घटनेचे प्रमाण वाढले आहे ,या संदर्भाचे निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चा सकारात्मक झाली असून रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन याप्रसंगी सन्माननीय उपायुक्त वाघ साहेब यांनी दिले.
या प्रसंगी धर्मेश निकोसे (जिल्हा कार्यकारी सदस्य), शिरीजकुमार गोगुलवार (शहराध्यक्ष बहुजन समाज पार्टी),प्रशांत रामटेके (शहर उपाध्यक्ष),राहुल कामटे (सेक्टर अध्यक्ष),सागर करमरकर (सेक्टर अध्यक्ष),शरद दुर्गे (सेक्टर अध्यक्ष) ,दुर्गेश शर्मा, जय बजाज , वीरेंद्र प्रजापती, सुरज हिरेमठ, पवान श्रीवास्त आदींची उपस्थिती होती.

