महिलांना आत्मनिर्भर करणार मेघा संजय मारणे.
मेघा संजय मारणे जनसेवा ग्रामविकास पॅनल मधून निवडणूक लढवत आहे .वार्ड क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत आहे. माझे निवडणूक चिन्ह अंगठी आहे .महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. आज पर्यंत मी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर स्वयंपूर्ण आत्मनिर्भर केले आहे .स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करून लघु उद्योग कुटिर उद्योग टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे ,असे विविध उपक्रम राबवून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच वार्डातील रस्ते ,लाईट, आरोग्य ,पाणी ,अशा मूलभूत सुविधा सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील माणसा पर्यंत पोहोचण्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे .पक्षविरहित राजकारण करून कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून मी वॉर्डाचा चौफेर विकास करणार आहे .तरी सुजाण मतदार बंधू-भगिनींना ग्रामीण विकास पॅनल मधील सर्व उमेदवाराला प्रचंड मताने विजय करून मतदान रुपी आशीर्वाद देऊन समाजसेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती.

