खुषखबर !प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांची ११.१.२०२१ रोजी सोडत होणार
पिंपरी चिंचवड:खुषखबर !प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांची ११.१.२०२१ रोजी सोडत होणार अशी माहीती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे अनेकांचे लक्ष आता या सोडतीकडे लागले आहे यात शंका नाही.
केंद्र प्नशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी च-होली, रावेत व बो-हाडेवाडी येथे स्वस्त घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजनेस मा.महापालिका सभेत ठराव क्रमांक 519 दिनांक 26/ 2 2020 अन्वये मान्यता दिलेली आहे .या योजनेसाठी दिनांक 17/8/2020 ते 10 /10/2020 या कालावधीत नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजने करीता एकुण 47878 ईतके अर्ज प्राप्त झाले असुन त्यापैकी 47801 अर्ज पात्र ठरलेले आहेत. सदर प्रकल्पाचा तपशील खालील प्रमाणे
प्रकल्पाचे नाव – एकुण
च-होली -1442
रावेत -934
बो-हाडेवाडी -1288
एकुण -3664
या योजनेकरिता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दिव्यांग व ईतर याप्रमाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरक्षण असेल.
या योजने करिता 3664 सदनीकेचे निवड यादी व त्याच प्रमाणात प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामध्ये सदनिका धारकास प्रथमतः दहा टक्केस्वहीस्सा भरावा लागेल.
या योजनोची सोडत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या फेसबुक पेज वर लाईव्ह व युट्यूब द्वारे दाखवण्यात येणार असल्याने नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी करोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून गर्दी करू नये .
सोडतीचा सविस्तर तपशील महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर व वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.
या प्रकल्पाची सोडत दिनांक 11 /1/ 2021 रोजी दुपारी तीन वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे आमदार तथा माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य श्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून श्री अजितदादा पवार ( उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर श्रीम.. उषा उर्फ माई ढोरे या राहतील.
विशेष उपस्थिती आमदार श्री लक्ष्मण जगताप, आमदार श्री महेश लांडगे तसेच प्रमुख उपस्थिती खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, श्रीमती सुप्रिया सुळे ,डॉ. श्री. अमोल कोल्हे, आमदार श्री संग्राम थोपटे श्री अण्णा बनसोडे यांची असेल.

