वॉर्डाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय :-सौ. मंगलताई तुकाराम घोगरे
सौ.मंगलताई तुकाराम घोगरे माण ग्रामपंचायत निवडणूक 2021 वार्ड क्रमांक एक मधील सुसंस्कृत अभ्यासू लोकप्रिय उमेदवार म्हणून सौ मंगलताई तुकाराम घोगरे ह्या परिचित आहेत .वार्डामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी ,रस्ते ,लाईट, ड्रेनेज लाईन आणि आरोग्य सेवा सर्वसामान्य पर्यंत पोचवण्याचा माझा मानस आहे .स्थानिक पातळीवर तरुण सुशिक्षित बेरोजगारांना कंपनीमध्ये नोकरी मिळण्यासाठी मी मदत करणार आहे .तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग कुटीर उद्योग निर्माण करून महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना आर्थिक स्वयंपूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. निराधार, विधवा, श्रावण बाळ, रमाई आवास योजना ,समाज कल्याण च्या विविध योजना प्रभावीपणे राबवून वॉर्डाचा चौफेर विकास करणार आहे .तरी सुजान मतदार बंधू-भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की मला प्रचंड मताने विजय करून समाज सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती करते.

