एकच ध्यास वार्डाचा विकास :-युगंधरा नवनाथ पारखी
सौ.युगंधरा नवनाथ पारखी मान ग्रामपंचायत निवडणूक 2021 वार्ड क्रमांक पाच मधील सुसंस्कृत अभ्यासू सुशिक्षित लोकप्रिय उमेदवार म्हणून सौ युगंधराताई नवनाथ पालखी ह्या परिचित आहेत . त्यांनी करुना महामारी मध्ये गरजू लोकांना मदत करून शासनाच्या योजनांची माहिती पुस्तिका मोफत दिली अशा ह्या अभ्यासू व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वाला समाजसेवा करण्याची संधी दिल्यास संधीचे सोने झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही तसे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून शिवणकाम, भरतकाम, लघु उद्योग, कुटिरोद्योग, अशाप्रकारे विविध उपक्रम राबवून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना आर्थिक स्वावलंबी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला ग्रामपातळीवर शासनाच्या विविध योजना त्यामध्ये निराधार विधवा ,श्रावण बाळ, समाज कल्याण च्या विविध योजना राबवणार आहे. तसेच माण मधील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. गावातील ड्रेनेज लाईन, लाईट, पाणी, घनकचरा स्वच्छ पिण्याचे पाणी इत्यादी कामावर मी विशेष लक्ष देणार आहे .तरी सुजाण नागरिकांनी काळभैरवनाथ ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करून समाज सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती

