मूलभूत सुविधांना प्राधान्य देणार:- शाम गोकुळ गोडांबे
शाम गोकुळ गोडांबे घोटावडे ग्रामपंचायत निवडणूक 2021 वार्ड क्रमांक पाच मधील अभ्यास होतकरू गरिबाच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून शाम गोकुळ गोडांबे हे परिचित आहेत या वार्ड मध्ये गटारीची मोठी समस्या आहे ती सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. आणि स्मशानभूमी ची मोठी समस्या आहे .ती जुनी असून पत्रे पूर्ण जीर्ण झालेलेआहेत.हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी वार्डातील जेष्ठ तरुण महिलाना एकत्रित बसून विचारविनिमय करून हे प्रश्न कायमचे मिटवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे .बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी मी व कटीबद्ध राहणार आहे .आणि स्थानिक तरुणांना कंपनीमध्ये काम देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे .तरी सुजान नागरिक बंधू-भगिनींनी माझ्या कपबशी या चिन्हा समोरील बटन दाबून समाज सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती करतो.

