वॉर्डाचा चौफेर विकास करणार :-सौ. रूपालीताई नवनाथ बोडके
सौ.रूपालीताई नवनाथ बोडके माण ग्रामपंचायत निवडणूक 2021 वार्ड क्रमांक चार मधील सुसंस्कृत अभ्यास सुशिक्षित लोकप्रिय उमेदवार म्हणून सौ रूपाली ताई नवनाथ बोडके ह्या परिचित आहेत "जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी"या म्हणीप्रमाणे अशा अभ्यासू महिलांना समाज सेवा करण्याची संधी दिल्यास संधीचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही .माजी उपसरपंच सुनंदाताई बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढवत आहे .त्यांनी विविध विकास कामे केली आहेत .त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी पुढील समाजसेवेची वाटचाल करणार आहे .स्थानिक बचत गटांना मी लघु उद्योग, कुटिर उद्योग ,भरत काम, शिवणकाम, हाउसकीपिंग कॅन्टीन, ट्रान्सपोर्ट, इत्यादी कामे देऊन महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना मी आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करणार आहे .तसेच मी ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य असे विरंगुळा केंद्र चालू करणार आहे . विधवा निराधार व समाजातील उपेक्षित महिला आणि गरीब व होतकरू गरीब विद्यार्थ्यांसाठी माझ्या स्वखर्चाने आर्थिक मदत करणार आहे . स्थानिक तरुण बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. तसेच रस्ते, ड्रेनेज लाईन ,लाईट, पाणी, इत्यादी कामे करून घनकचरा व्यवस्थापन करणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून गरिबासाठी रुग्णवाहिका मिळवून देण्याचा माझा मानस आहे तरी सुजान नागरिक बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की वार्ड क्रमांक ४ मधील सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करून समाज सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती करते.

