राष्ट्रवादी आमदाराच्या पुत्रावर फसवणुकीचा गुन्हा, परस्पर कर्ज काढल्याचा आरोप

0 झुंजार झेप न्युज

राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यावर फवसणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश बार्शी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिले आहेत. 

सोलापूर : राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे (Ranjit Singh Shinde) यांच्यावर फवसणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश बार्शी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिले आहेत. शेतकरी श्रीहरी शिंदे यांच्या नावाने 3 लाख 93 हजार रुपयांचे कर्ज परस्पर काढल्याचा आरोप रणजितसिंह शिंदे यांच्यावर आहे.

नेमकं प्रकरण काय ?

बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी शेतकरी श्रीहरी शिंदे यांच्या नावावर परस्पर कर्ज काढल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी श्रीहरी शिंदे यांच्या नावाने कागदपत्रे तयार करून बँक ऑफ इंडिया मध्ये खाते उघडले. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर श्रीहरी शिंदे यांच्या नावे 3 लाख 93 हजार रूपयांचे कर्ज मंजूर झाले. त्यानतंर मंजूर झालेली रक्कम परस्पर रणजितसिंह शिंदे यांच्या नावावर वर्ग करण्यात आल्याचा आरोप रणजितसिंह यांच्यावर आहे. या कर्जाबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचा दावा श्रीहरी शिंदे यांनी केला आहे. रणजितसिंह शिंदे हे बबनराव साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

नोटीस आल्यांतर बाब उघड

रणजितसिंह शिंदे यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम वर्ग झाल्याचीही कल्पना शेतकरी श्रीहरी शिंदे यांना नव्हती. मात्र, कर्जाची रक्कम व्याजासह परत करण्याची नोटीस श्रीहरी शिंदे यांना आल्यानंतर हा प्रकार समसल्याचे श्रीहरी यांचा दावा आहे. कर्जाची व्याजासह रक्कम 3 लाख 93 जार 202 रुपये आहे.

दरम्यान, सत्तेत असेलल्या राष्ट्रवादी काँग्रेसमागच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. बार्शी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आमदार पुत्र रणजितसिंह शिंदे, बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज कारखान्याचे कार्यकारी संचालक, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी आणि अन्य एकाजणावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार बबनराव शिंदे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठऱणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.