आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी सायंकाळी नवी मुंबईचा फेरफटका मारला. यावेळी त्यांनी एका अंडा भुर्जीच्या हातगाडीवर स्वत: अंडा भुर्जी बनवली.
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी सायंकाळी (Rohit Pawar Cook Anda Bhurji) नवी मुंबईचा फेरफटका मारला. यावेळी त्यांनी एका अंडा भुर्जीच्या हातगाडीवर स्वत: अंडा भुर्जी बनवली. रोहित पवारांचं हे नवं रुप पाहून सर्वच आवाक झाले. एक आमदार रस्त्यावरील अंडा भुर्जीच्या हातगाडीवर स्वत: अंडा भुर्जी बनवतो हे पाहून सर्वच चकित झाले.
याबाबत आमदार रोहित पवारांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली. “नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला.यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचं त्या युवाचं स्कील पाहून मलाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही.शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला”, असं त्यांनी सांगितलं.

