काँग्रेसची मोठी घोषणा, आमचा स्टँड क्लिअर, महापालिका निवडणुका एकटेच लढणार

0 झुंजार झेप न्युज

 काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

मुंबईः मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केलीय. देशात एका राज्याएवढं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. आता काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आम्ही वॉर्डमध्ये 100 दिवसांचा रिव्ह्यू प्लॅन आखलाय, वॉर्डनिहाय रिव्ह्यू करणार आणि एकटं लढण्याची आमचा निर्णय ठाम असल्याचंही भाई जगताप यांनी अधोरेखित केलंय. मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मोफत पाणी देण्याची मागणीही या निमित्तानं काँग्रेसनं केलीय. मनपाच्या तिजोरीवर केवळ 168 कोटींचा बोजा पडणार असला तरी मोफत पाणी देणं गरजेचं असल्याचंही मतही भाई जगतापांनी व्यक्त केलंय.

पाणी माफिया मोठ्या प्रमणात पाणीचोरी करतात, त्याऐवजी हे पाणी गोरगरिबांना मिळायला हवं. देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत झोपडपट्टीवासीयांची घरं नियमित करण्याच्या घोषणा केल्या, पण त्याचं पुढे काय झालं?, असा प्रश्नही भाई जगपातांनी उपस्थित केलाय. बाळासाहेब थोरातांना मुंबईबद्दल आदर आहे, मुंबई अध्यक्षाबद्दल हे आज ठरलेलं नाहीये. आमचे प्रभारी एच. के. पाटलांनी जे काही सांगितलं ते योग्यच असल्याचंही भाई जगतापांनी अधोरेखित केलंय.

प्रत्येक वॉर्डात जनता दरबार

“मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत. महाविकास आघाडीचे सदस्य आहोत. महाविकासआघाडी कॉमन मिनिमम प्रोगामवर चालतेय. त्यामुळे महापालिकेचा आणि महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही. कारण आम्ही इथे विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे 227 जागांवर लढण्याचा मनसुबा मी पहिल्याच दिवशी सांगितला होता. मुंबई अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा पुनर्ऊल्लेख केलाय होता, असंही भाई जगताप काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. आम्ही पुढील 100 दिवसांत प्रत्येक वॉर्डात जाऊ. तिथे जनता दरबार करू, लोकांची काम करू, त्या कार्यकर्त्याला विचारू आणि त्यानंतर वरिष्ठांना 227 जागा का लढायच्या हे सांगू,” असेही जगताप यांनी सांगितले होते. “भाजपबरोबर सेना सत्तेत असताना मुंबई पालिकेत भाजप विरोधी पक्षात होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना भाकितं करायची सवय आहे. भविष्य पाहून सरकार येत‌ नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.