परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 31 मार्चपर्यंत बस सेवा पुर्णतः बंद

0 झुंजार झेप न्युज

परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा बसची चाक थांबली आहेत. आजपासुन 31 मार्चपर्यंत बस सेवा पुर्णतः बंद करण्यात आली आहे.

परभणी : जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. आजपासून आंतरजिल्हा आणि जिल्ह्याअंतर्गत बस सेवा 31 मार्चपर्यंत पुर्णपणे बंद असणार आहे. रोज साधारणतः जिल्ह्यातून 800 ते 900 बस फेऱ्या होत असतात त्या बंद झाल्या असल्याने एसटी महामंडळाला रोज 30 लाखांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. याशिवाय हॉटेल्स, रेस्टारंट, चहा ठेले, पानपट्टी धारक यांनाही आपली प्रतिष्ठाणं बंद ठेवून केवळ पार्सल सुविधा देता येणार आहे. एकूणच वाढत्या संसर्गाने जिल्ह्यातील निर्बंध हे अधिकपणे कडक करण्यात आले आहेत.

वाढत्या कोरोना परिस्थितीमुळे प्रशासन गंभीर परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने कडक पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर 18 मार्चला एसटी बसला तब्बल एक लाख रुपयांचा दंड केला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.