पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता, खासगी रुग्णालयांकडून बेड राखीव ठेवण्यास नकार

0 झुंजार झेप न्युज

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे महापालिकेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

पुणे : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे महापालिकेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पुणे महापालिकेतील 5 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तर दुसरीकडे पुण्यातील खाजगी रुग्णालयाने नॉन कोव्हिड बेड कोरोना रुग्णांसाठी देण्यास नकार दिला आहे.

पुणे महापालिकेत कोरोनाचा शिरकाव

पुणे महापालिकेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पुणे महापालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याशिवाय महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यालाही दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. पुण्यात कोरोना सर्वेक्षण करत असताना हा संसर्ग झाला असल्याचे बोललं जात आहे. पुणे महापालिकेत आतापर्यत तब्बल 669 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

खाजगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णांना बेड देण्यास नकार 

एकीकडे पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे पुण्यातील खाजगी रुग्णालयाने नॉन कोव्हिड बेड कोरोना रुग्णांसाठी देण्यास नकार दिला आहे. पुणे महापालिका प्रशासनाची खासगी रुग्णालय चालकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान खाजगी रुग्णालयातील 50 टक्के बेड हे राखीव ठेवावेत असे आदेश दिले आहेत. मात्र रुग्णालयांनी या आदेशांना नकार दिला आहे.

मात्र दोन दिवसात बेडची व्यवस्था करा, अन्यथा सक्तीने ताब्यात घेऊ, अशी तंबी महापालिकेने दिली आहे. जर 50 टक्के बेड दिले नाहीत. तर 80 टक्के बेड राखीव ठेवण्याचे धोरण आखावं लागेल, असा इशाराही पालिकेने दिला आहे. पुणे शहरातील शासकीय हॉस्पिटलमधील बेड फुल्ल झाल्यानं महापालिका अॅक्शन मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसात पुणे शहरातील खाजगी हॉस्पिटलमधील 50 टक्के बेड पालिका ताब्यात घेणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक 

राज्यात काल दिवसभरात 24 हजार 645 रुग्ण आढळून आले आहेत. काल नवीन 19463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 22 लाख 34 हजार 330 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 2 लाख 15 हजार 241 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22 % झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. दिवसभरात 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती

पुण्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. काल दिवसभरात 2 हजार 342 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 1 हजार 789 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. पुण्यात काल दिवसभरात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 2 रुग्ण हे पुण्याबाहेरील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पुण्यात सध्या 524 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 23 हजार 65 आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.