आमदार असावा तर असा! रेमडेसिव्हीरसाठी 20 लाखाचा निधी जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द!

0 झुंजार झेप न्युज

रेमडेसिव्हीर इंजेक्शन घेण्यासाठी 20 लाख रुपये एमआयएमचे आमदार फारुख शाह यांनी सुपूर्द केले आहे.

धुळे: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धुळे शहरातील आमदार डॉ. फारुख शाह यांनी जनतेच्या सेवेसाठी कौतुकास्पद कार्य हाती घेतले आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन घेण्यासाठी 20 लाख रुपये एमआयएमचे आमदार फारुख शाह यांनी सुपूर्द केले आहे. 

ऑक्सिजन प्लांटसाठी 80 लाखांचा आमदार निधी

आमदार फारुख शाह यांनी त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतः च्या मालकी हक्काच्या जागेवर ऑक्सिजन प्लांट उभारणीकरिता 80 लाख रुपयाचा स्थानिक आमदार निधीही देत असल्याचे निवेदन आज जिल्हाधिकारी प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे अशा जनतेच्या सेवेत निस्वार्थपणे काम करणाऱ्या आमदार डॉ.फारुख शाह यांचं सर्वत्र कौतुक देखील होत केल जात आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांची उपचारांसाठी भटकंती

देशातील अनेक राज्यांत करोना संक्रमण वाढत असल्याचं चित्र दिसून येत असतानाच ‘ऑक्सिजन सिलिंडर’ आणि रेमडेसिव्हीर’ मिळवण्यासाठी नागरिकांची केविलवाणी धडपड सुरू असल्याचं समोर येतंय. धुळे शहरासह जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी भटकंती होताना दिसत आहे. या भयंकर संकटामुळे लोकांचे अश्रू अनावर देखील झाले आहेत…

कोरोनाला आटोक्यात आणण्याकरिता जिल्हा प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. तरी देखील प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे. या दृष्टिकोनातून आपल्या उदात्त हेतूने जनतेच्या हितासाठी शहरातील आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शन घेण्याकरिता 20 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केला आहे.

त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरातील एमआयडीसी मधील स्वतः च्या मालकी हक्काच्या जागेवर ऑक्सिजन प्लांट उभारणीकरिता 80 लाख रुपयाचा स्थानिक आमदार निधीही देत असल्याचे निवेदन आज जिल्हाधिकारी प्रशासनाला दिले आहे. जनतेच्या सेवेसाठी लवकरात लवकर ऑक्सिजन प्लांट उभारण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी, अशी विनंती देखील आमदारांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.