ऑक्सिजन गळती दुर्घटना, मृतांची संख्या वाढली, 22 जणांचा मृत्यू झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

0 झुंजार झेप न्युज

 नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात टँकरमधून आॉक्सिजन टँकमध्ये भरताना गळती झाली होती.

नाशिक : नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात  टँकरमधून आॉक्सिजन टँकमध्ये भरताना गळती झाली होती. यादुर्घटनेत जवळपास 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी जवळपास 150 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. तर, जवळपास 30 ते 35 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचा दावा केला जातोय. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये टँकरमधून ऑक्सिजन भरायचे काम सुरु होते. ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनानं धावपळ केली. मात्र, यावेळी रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना याचा त्रास झाला आणि यामध्ये 22 जणांना जीव गमावावा लागला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.