लसीकरण मोफत करण्यासाठी सोनिया गांधी आग्रही आहेत. तर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.
सांगली: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या मोफत लसीकरणासाठी आग्रही आहेत. मात्र, महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सत्तेसाठी लाचार आहेत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.ते बुधवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लसीकरण मोफत करण्यासाठी सोनिया गांधी आग्रही आहेत. तर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. पण काँग्रेस मधील नेते सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी सत्तेसाठी नांग्या टाकल्या आहेत, असे पडळकर यांनी म्हटले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धान्य वाटप आणि मदत देतो म्हटले होते. पण अद्याप ही मदत मिळालेली नाही. प्रत्येक घरात कोरोना निघाल्यावर मदत मिळणार का, असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.
टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांनी आता आदित्य ठाकरेंना डिवचले
आदित्य ठाकरे यांच्या ट्विटवरुन मोफत लसीकरणाच्या वादाला सुरुवात झाली होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लसीकरणाबाबतचं ट्विट डिलीट केल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. यावरुन पडळकर यांनी आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावला होता.बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करण्याचं ट्विट केलं. ते ऐकून खूप आनंद झाला. पण काही वेळातच त्यांनी ट्विट डिलीट केलं. महाराष्ट्रातील जनतेच्याहिताचा निर्णय त्यांनी मागे घेऊ नये, असे पडळकर यांनी म्हटले होते.

