अजित पवार-अशोक चव्हाण चौकशांना सामोरे गेले, शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नका : नितेश राणे

0 झुंजार झेप न्युज

उद्या तोंड काळं होण्यापेक्षा आजच राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरं जा" अशा शब्दात नितेश राणेंनी निशाणा साधला.

सिंधुदुर्ग : “वकील आहात, लहान शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नयेत” अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब  यांना फटकारलं. “जो नियम अनिल देशमुख, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना लागू झाला होता, तोच आता अनिल परब यांना लागतो” असंही नितेश राणे म्हणाले. 

“गृह खातं अनिल परब चालवतात यावर शिक्कामोर्तब” 

“विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विचारलं होतं की गृह खाते अनिल देशमुख चालवतात की अनिल परब, यावर काल शिक्कामोर्तब झालं आहे. वकील असलेल्या माणसाने अशा प्रकारच्या शपथा खायच्या असतात का? तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला हवं” अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

“शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नका”

“जो नियम अनिल देशमुख यांना लागतो, जो नियम सिंचन घोटाळ्याच्या वेळी अजित पवारांना लागला, जो नियम आदर्श घोटाळ्याच्या वेळी अशोक चव्हाण यांना लागू होतो, तोच अनिल परब यांना लागतो. तेव्हा त्यांनी शपथा खाल्ल्या नव्हत्या. ते चौकशीला सामोरे गेले. लहान शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नका” असं नितेश राणे म्हणाले.

“सचिन वाझे आणि अनिल परब यांच्यामधले संवाद हे एनआयकडे आहेत. टेलिग्रामचे चॅट पण त्यांच्याकडे आहेत. उद्या तोंड काळं होण्यापेक्षा आजच राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरं जा” अशा शब्दात नितेश राणेंनी निशाणा साधला.

नितेश राणे यांचे ट्वीट

“मी विचार करत होतो… मला शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून अजूनही मानहानीची नोटीस येणार का? आतुरतेने वाट पाहतोय. वकील साहेबांची तर काल लागली… आता नोटीस कोण बनवणार?” असा उपरोधिक सवाल नितेश राणे यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.