पुण्यात कोरोनाचा हाहा:कार, रुग्णालये अपुरी; रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स घेतल्या भाड्याने

0 झुंजार झेप न्युज

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचंड संसर्ग वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तर कोरोनाचा स्फोटच झाला आहे. पुण्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला असून रुग्णालयेही भरून गेली आहेत.

पुणे: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचंड संसर्ग वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तर कोरोनाचा स्फोटच झाला आहे. पुण्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला असून रुग्णालयेही भरून गेली आहेत. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स भाड्याने घेतली जात आहेत. कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत असल्याने पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात बेड्स कमी पडत आहेत. पुण्यात गेल्या 15 दिवसात दररोज चार हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठीच्या बेड्सची संख्या कमी झाली आहे. पुण्याच्या रुबी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे बेडची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णालयाने तीन हॉटेल्स भाड्याने घेतल्या असून या ठिकाणी 180 बेड्स उलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुबी रुग्णालयाशिवाय पुण्याच्या सरकारी रुग्णालय आणि इतर रुग्णालयात बेडसची झपाट्याने कमतरता जाणवत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पुण्यात सध्या किती रुग्ण?

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 2 लाख 83 जार 819 रुग्ण इतकी आहे. यापैकी 2 लाख 38 हजार 890 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात सध्या 39 हजार 518 सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत 5 हजार 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचा मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका आहे. शहरासह जिल्ह्याची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे.. त्यामुळे आता लसीकरण आणि कडक निर्बंध हाच त्यावर उपाय आहे.

मुंबईत बेडस पुरेशा, पण संख्या वाढतेय

मुंबईत दिवसाला सरासरी दहा हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पालिकेच्या माहितीनुसार मुंबईत पुरेशा प्रमाणात बेड्स आहेत. परंतु कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत सध्या 5400 बेड्स रिकाम्या आहेत. 5 एप्रिलपर्यंतचा हा आकडा आहे. मुंबईत सुमारे 17 हजार बेड्स फुल्ल झाल्या आहेत. तर 136 आयसीयू बेड्स रिकाम्या असून 51 व्हेंटिलेटर बेड्सही रिकाम्या आहेत.

पुण्यात सध्या बेड्सची स्थिती

>> ऑक्सिजन बेड्स – 4517

>> ऑक्सिजन विरहीत बेड्स – 2314

>> आयसीयू बेड्स – 424

>> व्हेंटिलेटर्स बेड – 515

>> एकूण – 7770

शिल्लक बेडची स्थिती

>> ऑक्सिजन बेड्स – 418

>> ऑक्सिजन विरहीत बेड्स – 695

>> आयसीयू बेड्स – 12

>> व्हेंटिलेटर्स बेड – 12

>> एकूण – 113

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.