अहमदाबादच्या कृष्णानगर परिसरातील एका शाळेत आग लगनल्याची घटना पुढे आली आहे. अंकुर स्कूल या शाळेत अचानक आग लागली.
अहमदाबाद : अहमदाबादच्या कृष्णानगर परिसरातील एका शाळेत आग लगनल्याची घटना पुढे आली आहे. अंकुर स्कूल या शाळेत अचानक आग लागली. या आगीत 4 विद्यार्थी अडकल्याची भीती होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमंन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. शाळेच्या इमारतीमधून आगीचे मोठ मोठाले लोळ उठत होते.
अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या कुलिंग प्रॉसेस सुरु आहे. शाळेच्या इमारतीतून आगीचे मोठ मोठाले लोळ उठत होते. मात्र, अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रम मिळवण्यात यश आलं आहे
पण, अशात हा प्रश्न उपस्थित होत आहे की, सध्या कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत. मग या शाळेत विद्यार्थी आले कुठून. या शाळेत आग कशी लागली याबाबत सध्या काहीही माहिती नाही.

