राज्यातील बसपाच्या सर्व लहान मोठ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना राज्याचा संघटन प्रमुख म्हणून नम्रपणे विनंती करत आहे.
राज्यातील बसपाच्या सर्व लहान मोठ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना राज्याचा संघटन प्रमुख म्हणून नम्रपणे विनंती करत आहे कुणीही कोरोना ला गमतीवर घेऊ नका,मागच्याच आठवड्यात आपल्या तोलामोलाच्या डझनभर कार्यकर्त्यांनी जगाचा कोविड च्या प्रादुर्भावामूळे निरोप घेतला आहे आणि अनेक लोक जगण्यासाठी संघर्ष करत आहेत, मी आपणास घाबरवून देण्यासाठी सदरचा पत्रं प्रपंच करत नसून आपण सर्वांनी जबाबदारी ने वागावे या साठी विनंती करीत आहे,दिवसेंदिवस आरोग्य यंत्रणा तोकडी पडत चालली आहे सध्याची परिस्थिती पाहता ही आरोग्य आणीबाणी असल्याचे स्पष्ट दिसत आहे,आपण अनेक वर्षे सातत्यपूर्ण समाजामध्ये कार्यकर्ता,पदाधिकारी म्हणून कार्यरत आहात त्यामूळे आपले कार्यकर्तापण आपणास शांत बसू देत नाही तरी सुद्धा आपण सर्वांनी जाणीवपुर्वक खबरदारी घेऊन आपण सुरक्षित राहून समाजालाही सुरक्षितता प्रदान करावी ही विनंती...!!*
विनीत:-
अँड. संदीप ताजणे
(प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र बसपा.)

