मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह, केजरीवाल विलगीकरणात

0 झुंजार झेप न्युज

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अरविंद केजरीवाल स्वत: विलगीकरणात गेले आहेत.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी दिल्लीत पुढील आठवडाभर दिल्लीत लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. अशावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अरविंद केजरीवाल स्वत: विलगीकरणात गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुनिता केजरीवाल या होम क्वारंटाईन झाल्या आहेत.

अरविंद केजरीवाल यांना जून 2020 मध्येही कोरोनाची लक्षणं आढळून आली होती. पण त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. दिल्लीतील कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना केजरीवाल स्वत: मैदानात उतरुन उपाययोजना करत होते. यांनी अनेक बैठकांसह दौरेही केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. दिवसेंदिवस चिंताजनक आकडेवारी समोर येतेय. काल दिवसभरात दिल्लीमध्ये 23 हजाराच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते.

दिल्लीत 8 दिवसाचा लॉकडाऊन

देशाच्या राजधानीमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. नवी दिल्लीतील आरोग्य यंत्रणा कोलमडली नाही मात्र, आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेएवढे रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीमुळं नवी दिल्लीमध्ये पुढील आठवडाभर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना त्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. राज्यात 25 हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. या रुग्णसंख्या आणि दिल्लीची आरोग्य यंत्रणा जवळपास सारखी आहे. यामुळं यंत्रणेवर ताण आला आहे. सरकारकडून आरोग्य यंत्रणा कोलमडली जाऊ नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

तर बेड कमी पडू शकतात

नवी दिल्लीत गेल्या 24 तासात 23 हजार 500 रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढीचा असाच वेग राहिला तर दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड कमी पडू शकतात, असं केजरीवाल म्हणाले.

पुढच्या सहा दिवसात काय करणार?

अरविंद केजरीवाल यांनी पुढील सहा दिवसात आरोग्य यंत्रणा बळकट करणार असल्याचं सांगितले. येत्या सहा दिवसात बेडची संख्या वाढवली जाईल. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ऑक्सिजन, औषधे यांची व्यवस्था करणार आहोत. सर्व दिल्लीकरांनी 26 एप्रिलपर्यंत लावलेल्या लॉकडाऊनमध्ये सहकार्य करावं. दिल्लीला सहकार्य केल्याबद्दल केंद्र सरकारचं आभार असंही केजरीवाल म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.