कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, प्रकाश जावडेकरांनाही कोरोनाची लागण

0 झुंजार झेप न्युज

यापूर्वी 78 वर्षांचे येडियुरप्पा यांना 2 ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजतेय. 

बंगळुरूः कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा  यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेय. त्यांचा चाचणी अहवाल शुक्रवारी परत पॉझिटिव्ह आला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठ महिन्यांत दुसर्‍यांदा येडियुरप्पांना कोरोनाची लागण झालीय. यापूर्वी 78 वर्षांचे येडियुरप्पा यांना 2 ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजतेय.

आज कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली: प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. तसेच मी आज कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. गेल्या 2-3 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया स्वत: ची चाचणी करून घ्यावी, असंही प्रकाश जावडेकरांनी सांगितलंय.

सध्या मी ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मला रुग्णालयात दाखल केले

तर येडियुरप्पा यांनीसुद्धा ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचं सांगितलंय. ते म्हणाले, मला सौम्य ताप आल्यानंतर कोरोना चाचणी केली असता, मला संक्रमण झाल्याचं समजलं. सध्या मी ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मला रुग्णालयात दाखल केले जात आहे, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिलीय. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अलीकडेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिलाय. कर्नाटक मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीएम येडियुरप्पा यांना ताप आला होता आणि त्यानंतर ते तपासणीसाठी रामय्या रुग्णालयात गेले. तिकडे कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आलीय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.