लॉकडाऊन च्या काळात सर्वसामान्य जनतेची घोर पिळवणूक......
ता.कळंब. (राजेंद्र ओव्हाळ प्रतिनिधी)गेल्या वर्षभरात भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगालाच हादरून टाकणाऱ्या हादरून टाकणाऱ्या कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक देशात तेथील कोरोणा रोगाची परिस्थिती लक्षात घेऊन काही उपाययोजना करण्याच्या हेतूने काही कडक निर्बंध टाकलेले आहेत. परंतु लॉकडाऊन मध्ये बरेच लोक जनतेला लुटून आपली आपली पोळी पिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तशाच प्रकारांपैकी एक प्रकार कळंब ते केज या प्रवासाच्या तिकिटाचा दर पंचवीस रुपये इतका असताना. आज शंभर रुपये या प्रमाणात वसूल केला जात आहे. यात गरीब व सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असल्याचे दिसून येते मा. जिल्हाधिकारी साहेब बीड. यांनी दिनांक 25 मार्च च्या मध्यरात्री बीड जिल्हा लॉकडाऊन करून दहा दिवसाचे निर्बंध बीड जिल्ह्यावर लादले होते. परंतु यानंतर या लॉकडाऊन मध्ये काही शिथिलता आणून सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत जीवन आवश्यक वस्तूंची खरेदी विक्री करण्यास थोडीशी सवलत दिली होती.परंतु या शिथिलतेचा फायदा घेत खाजगी वाहने रिक्षा चालक कळंब ते केज तिकिट दर पंचिविस रुपये असताना आज रोजी शंभर रुपये प्रति प्रवासी तिकिट दर ठेवून प्रवाशांची वाहतूक करतात तिकीट दरात तब्बल चार पटीने वाढ झालेली ही जनतेच्या खिशाला न परवडणारे असून खिशाला झळ पोचवत आहे.या जनतेच्या पिळवणूकीमुळे सर्व सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक असंख्य संकटाला तोंड द्यावे लागते...

