पुरेसा ऑक्सिजन साठा नसल्याने ठाणे पालिका हॉस्पिटलमधील रुग्णांचे स्थलांतर

0 झुंजार झेप न्युज

ठाणे महापलिकेने कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ग्लोबल कोविड सेंटर सोबतच पूर्व द्रुतगती महामार्गावर पार्किंग प्लाझा सेंटरची उभारणी केली आहे. अद्ययावत अशा या रुग्णालयात चारशे ते पाचशे कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. मात्र शनिवारी संध्याकाळी ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा उशीरा येणार असल्याचे डॉक्टरांना समजल्यानंतर महापलिकेची धावपळ सुरु झाली.

ठाणे : ठाण्यात एकीकडे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णांना ऑक्सिजन मिळणे देखील मुश्किल झाले आहे. ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोविड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजनचा साठा संपण्याची भीती वाटू लागल्याने अचानक 26 रुग्णांना ग्लोबल कोविड सेंटर म्हणजेच दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. एकूणच ऑक्सिजनचा साठा कमी झाल्याने रुग्णालयातील डॉक्टर आणि पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. ही बाब लवकर समजल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ठाणे महापलिकेने कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ग्लोबल कोविड सेंटर सोबतच पूर्व द्रुतगती महामार्गावर पार्किंग प्लाझा सेंटरची उभारणी केली आहे. अद्ययावत अशा या रुग्णालयात चारशे ते पाचशे कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात अनेक कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. मात्र शनिवारी संध्याकाळी ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा उशीरा येणार असल्याचे डॉक्टरांना समजल्यानंतर महापलिकेची धावपळ सुरु झाली. उपचार घेत असलेल्या रुग्णांना तातडीने दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. यावेळी 10 ते 12 रुग्णवाहिका तातडीने बोलावून या रुग्णांना ग्लोबल कोविड सेंटर येथे हलवण्यात आले. गंभीर परिस्थिती उद्भवू नये यासाठी या रुग्णांना हलवले जात असल्याची माहिती महापालिकेने दिली.

ठाण्यात कोविड रुग्णालयात ऑक्सिजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर लागत असते. हा ऑक्सिजन पुरवठा तळोजा येथून करण्यात येतो. मात्र तळोजा येथे काही तांत्रिक बिघाड झाल्याने ठाण्याच्या कोविड सेंटरमध्ये उशिरा ऑक्सिजनचा साठा येणार असल्याने कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी कुठलिही बाधा येऊ नये यासाठी रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले, असल्याची माहिती यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. 

महाराष्ट्रात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. कडक निर्बंध, थोडी सूट असं चालणार नाही. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही. आज टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर याबद्दल निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेतली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.