बुधवारी रोजी एकूण ३ लाख १४ हजार ८३५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोहचलीय.
नवी दिल्ली : देशात, बुधवारी (२१ एप्रिल २०२१) रोजी एकूण ३ लाख १४ हजार ८३५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर याच २४ तासांत देशात तब्बल २ हजार १०४ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात मंगळवारी एकूण १ लाख ७८ हजार ८४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ८४ हजार ६५७ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात २२ लाख ९१ हजार ४२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ३४ लाख ५४ हजार ८८०
उपचार सुरू : २२ लाख ९१ हजार ४२८
एकूण मृत्यू : १ लाख ८४ हजार ६५७
करोना लसीचे डोस दिले गेले : १३ कोटी २३ लाख ३० हजार ६४४
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २७ कोटी २७ लाख ०५ हजार १०३ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १६ लाख ५१ हजार ७११ नमुन्यांची करोना चाचणी बुधवारी करण्यात आली.

