पिंपरीत विदारक चित्र, YCM मध्ये रुग्णांना झोपावयाला जमीनही पुरेना

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील विदारक स्थिती आता समोर आली आहे. ही स्थिती बघून आपल्याही डोळ्यांमध्ये पाणी येईल.

पिंपरी चिंचवड:पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. हा आकडा थोपवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी प्रशासन प्रचंड प्रयत्नही करतंय. मात्र, आता प्रशासनही हतबल होताना दिसतंय. दररोज शेकडो कोरोनाबाधित आढळत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील विदारक स्थिती आता समोर आली आहे. ही स्थिती बघून आपल्याही डोळ्यांमध्ये पाणी येईल. महापालिकेच्या रुग्णालयात आता रुग्णांना चक्क जमीनीवर झोपवून ऑक्सिजन दिलं जातंय.

महापालिका रुग्णालयातील व्हेंटिलेटर बेड्स, ऑक्सिजन बेड्स संपले

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नाव आहे. मात्र, ह्याच महापालिकेच्या रुग्णालयातील विदारक घटना समोर आली आहे. महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याने यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये रुग्णाला जमिनीवर झोपून ऑक्सिजन दिले जात आहे. रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांची मोठी रांग लागलेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्यव्यवस्था एकदम कोलमडून गेली आहे. शहरातील महापालिका रुग्णालयातील व्हेंटिलेटर बेड्स, ऑक्सिजन बेड्स संपले आहेत.

बेड मिळवण्यासाठी पाच-सहा दिवसांची प्रतिक्षा

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना पाच ते सहा दिवस महापालिका रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत. या रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना दुसरीकडे बेड्स शोधण्याचे सांगण्यात येत आहे. बेड उपलब्ध नसल्यामुळे महापालिका रुग्णालयात फरशीवर झोपूनच इतर कोरोनाबाधित रुग्णांवर ऑक्सिजन लाऊन उपचार केले जात आहेत. याशिवाय बेड्स उपलब्ध होत नसल्यामुळे शहरातील सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.

मनुष्यबळाची कमतरता

गेल्या 15 ते 16 वर्षांच्या सरावामध्ये प्रथमच रुग्णांना बेड्स नसल्याच्या कारणांमुळे जमिनीवर झोपून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे, अशी प्रतिक्रिया उपचार करणारे डॉक्टर देत आहेत. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पिंपरी-चिंचवड शहरासह आसपासच्या जिल्ह्यांमधील रुग्ण हे उपचारासाठी येत असतात. शहरातील जम्बो कोविड सेंटर, ऑटो क्लस्टर कोविड सेंटर, नवीन भोसरी रुग्णालय हे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. शहरात विलगिकरन कक्ष वाढवावे लागतील. मात्र, हे सुरू करत असताना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या किती?

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 67 हजार 776 लाखाजवळ जाऊन पोहचली आहे. तर 2177 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. मात्र ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन कुठं तरी कमी पडत असल्याने ही विदारक स्थिती नागरिकांवर ठेपली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.