राज्य शासनाकडून प्राप्त ७ रुग्णवाहिकांचे प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरण

0 झुंजार झेप न्युज

 राज्य शासनाकडून प्राप्त ७ रुग्णवाहिकांचे प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरण

वाशिम, दि.०२: ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार प्राप्त होण्यासाठी राज्य शासनामार्फत जिल्ह्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे आज, २ जून रोजी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चक्रधर गोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले.

कारंजा तालुक्यातील धनज, उंबर्डा बाजार व मनभा प्राथमिक आरोग्य केंद्र, रिसोड तालुक्यातील कवठा व मोप प्राथमिक आरोग्य केंद्र, वाशिम तालुक्यातील वारला प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा प्राथमिक आरोग्य केंद्राला सदर रुग्णवाहिका वितरीत करण्यात आल्या. या रुग्णवाहिकांमुळे सदर प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रातील गंभीर व अतिगंभीर रुग्ण तसेच वयोवृद्ध, गरोदर महिला, बालके यांना तत्काळ आरोग्य सेवा व संदर्भ सेवा देण्यास मदत होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.