तंबाखूजन्य पदार्थ्यांची विक्री करणाऱ्या 27 पानटपरीवर कारवाई

0 झुंजार झेप न्युज

• 5 हजार 400 रुपयांचा दंड वसुल

वर्धा,दि.7 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत तंबाखू नियंत्रण पथकाने तंबाखू, सूपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणा-या 27 पानटपरी कारवाई करुन 5 हजार 400 रुपयाचा दंड वसूल केला. सदर कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनात दंत शल्य चिकित्सक डॉ. मोहित कोडापे, जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलुजा, समुपदेशक राहुल बुंचुंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे व अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त जंयत वाणे, किरण गेडाम, राजेश यादव, रमण बावने, संजय धकाते यांनी केली. 

तंबाखू नियंत्रण कायदा 2003 नुसार 29 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार तंबाखू, सूपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास, थुंकण्यास व धुम्रपान करण्यास मनाई आहे. आहे. त्यामुळे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत सामान्य रुग्णालय व अन्नऔषध प्रशासन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सदर कारवाई करण्यात आली.    

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.