दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करणार्या पोलिसांवर कारवाई करा -राजू आढाव.
अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कसारे या गावातील महार जातीतील महेश आण्णासाहेब बोराडे हा मताधिक्याने निवडून येवून घटनेने दिलेल्या नियमानुसार त्या गावचा सरपंच झाला याचा राग मनात धरून गावातील जातीयवादी कृष्णाजी सूर्यभान कार्ले व मच्छिंद्र हिरामण कार्ले यांनी जातीयवादी मानसिकतेतून महेश बोराडे यांना रस्त्यावर आडवून सार्वजनिक ठिकाणी त्याच्या गळ्यात तुटक्या जुन्या चपलांचा हार घालून आम्ही महारांचा याच पद्धतीने सत्कार करत असतो म्हणून त्याला आपमानीत करून बहिणीला मारहाण करून निघून गेले व बोराडे कुटुंबावर खोटा दरोड्याचा गुन्हा दाखल केला या घटनेचा जाहिर निषेध करून रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने संगमनेर तालुका शाखेच्या वतीने जिल्हाप्रमुख राजू आढाव यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डाॅ शशिकांत मंगरूळे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने साहेब यांना निवेदन देऊन खोटा गुन्हा दाखल करणार्या पोलिसांवर कारवाई करा म्हणून मागणी करण्यात आली. ....
याबाबत सविस्तर माहीती अशी की कसारे या गावातील ग्रामपंचायतीची सहा महिन्या पूर्वी निवडणूक झाली आणि सरपंच पदाचे आरक्षण हे एस.सी कॅटेगरी साठी निघाले महेश बोराडे हा मताधिक्याने निवडून आल्याने घटनेने घालून दिलेल्या नियमानुसार बोराडे हा त्या गावचा सरपंच झाला हे गावातील काही जातीयवादयांना विघ्नसंतोषींना त्याचे नेतृत्व मान्य नव्हते एक महार सरपंच झाला हे गावातील कृष्णाजी सूर्यभान कार्ले व मच्छिंद्र हिरामण कार्ले यांच्या डोळ्यात सलत होते त्याचा राग दि 26 रोजी महेश याची लहान मुलगी अजारी असल्याने बहिणीला सोबत घेऊन तळेगाव येथील दवाखान्यात घेऊन जात असताना वरील दोघांनी रस्त्यावर गाडी अडवून खाली उतरून महेश बोराडे च्या गळ्यात चपलांचा हार घालून आम्ही महारांचा असाच सत्कार करतो बहीण मध्ये पडली तर तीला मारहाण करून तुला काय वाकडे करायचे ते कर म्हणून निघून गेले. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामध्ये अडवून अपमानित केले .
अचानक घडलेल्या प्रकारा बाबत मुलीला दवाखान्यात न नेता घरी सोडले व संगमनेर तालुका पोलीस स्टेशन ला गेले असता पोलीसांनी देखील अपमानित करून पाच तास फिर्याद घेतली नाही काही कार्यकर्ते आल्यानंतर अॅट्राॅसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीसांनी समोरच्यांना बोलावून घेऊन आरोपींशी संगनमत करून 394 दरोड्या सारखा गंभीर गुन्हा बोराडे कुटुंबावर दाखल करण्यात आला वरील दोन्ही अरोपींना अटक करून महेश बोराडे यालाही अटक करण्यात आले ज्यांच्यावर संरक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांनीच आधिकाराचा पदाचा दुरुपयोग करून कोणतीही शहानिशा नकरता दरोड्या सारखा तथाकथित खोटा गंभीर गुन्हा दाखल करून सदर कुटुंबाचे जिवनच उध्वस्त करण्याचे कट कारस्थान केले व दलितांचा पिडीतांचा आवाज दाबून बोराडे कुटुंबांना नुकसान पोहचविण्याच्या दुष्ट हेतुने हेतुपुरस्सर जातीयवादी मानसिकतेतून केलेल्या संगमनेर तालुका पोलिसांच्या घृणास्पद कृत्याचा जाहीर निषेध करून वरील आधिकारी यांना निवेदन देऊन सदरच्या खोट्या गुन्ह्याची सखोल चौकशी करून तो तात्काळ रद्द करण्यात यावा तसेच संबंधित दोषीं पोलीस निरीक्षक व पोलीसांवर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करून जातीय तेढ दुर करा अशी मागणी करण्यात आली. ...यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजू आढाव जिल्हा ऊपप्रमुख भरतजी भांबळ गंगानाना विधाटे संगमनेर तालुका प्रमुख संदीप मोकळ महासचिव बच्चन भालेराव शहरप्रमुख देविदास बैरागी राहुरी युवक प्रमुख विनोद पवार अमोल शेळके चांगदेव पराड अरूण बागुल अमोल पराड प्रदीप मोकळ रविंद्र पराड इत्यादी ऊपस्थित होते
