अनुसूचित जमाती कल्याण समितीने घेतला विविध विषयांचा आढावा

0 झुंजार झेप न्युज

अनुसूचित जमाती कल्याण समितीने घेतला विविध विषयांचा आढावा 

भंडारा,दि.30 : विधीमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने शुक्रवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी दौरा केल्यानंतर आज (दि.30) जिल्हा परिषद सभागृहात समिती प्रमुख आमदार दौलत दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांचा आढावा घेतला. 

यावेळी आमदार सर्वश्री डॉ. अशोक उईके, श्रीनिवास वनगा, अनिल पाटील, सहसराम कोरोटे, राजेश पाडवी, भीमराव केराम, राजकुमार पटेल, किरण सरनाईक, रमेश पाटील, समितीचे उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव मोहन काकड यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय, सर्व नगरपरिषद, नगरपंचायत, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच विविध विभागांचा आढावा घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.