रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाच्या कार्यकरणीत विस्तार, बैठक संपन्न झाली.
मुंबई : रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाच्या काल झालेल्या विश्वशांती बुद्धविहार सांस्कृतिक केंद्र, सावित्रीबाई फुले नगर, सहार कार्गो रोड, विलेपार्ले (पूर्व) मुंबई ९९ या ठिकाणी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये सभाध्यक्ष सुमितजी वजाळे, सरचिटणीस रतन अस्वारे, कार्यध्यक्ष मोहन पवार, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रकाश कमळाकर जाधव ज्येष्ठ उपाध्यक्ष के.एस. गायकवाड, सचिव प्रा.अर्जुनराव माघाडे, उपाध्यक्ष भीमराव कांबळे, रामू हिरा कांबळे, संघटक संतोष थोरात, मुंबई उपाध्यक्ष अलि अहमद खान, ईशान्य जिल्हा सरचिटणीस विजय शेलार, विलेपार्ले बेसिक अध्यक्ष दिपक साळवी, विलेपार्ले अध्यक्ष रितेश घायवट यांच्या समक्ष मुंबई प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून *मा.गणेशन मुत्तुस्वामी* तर गोरेगाव तालुका अध्यक्ष म्हणून *संतोष मोतीराम भोसले* व वॉर्ड क्र.८६ च्या अध्यक्षपदावर *जितेंद्र बबन यादव* यादव यांची नियुक्ती करण्यात आली.
सर्वच मान्यवरांनी हार्दीक शुभेच्छा देऊन सर्वांचे अभिनंदन केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.
