प्रत्येक मजुरांना त्यांच्या गावातच काम उपलब्ध होण्यासाठी किमान पाच कामे सेल्फवर मंजुर करा-जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

0 झुंजार झेप न्युज

प्रत्येक मजुरांना त्यांच्या गावातच काम उपलब्ध होण्यासाठी किमान पाच कामे सेल्फवर मंजुर करा-जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना,दि. 21 : मागेल त्या मजुरांना त्यांच्या गावातच काम उपलब्ध व्हावे यादृष्टीकोनातुन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान 5 कामे वर्षभरासाठी सेल्फवर मंजुर करुन ठेवण्याबाबत नियोजन करण्याकचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविधविषयाबाबत जिल्हास्तरीय सर्व यंत्रणाप्रमुख व सर्व तालुकास्तरीय यंत्रणाप्रमुख यांच्या आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या प्र. मुख्य् कार्यकारी अधिकारी श्रीमती कल्पना क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, विभागीय वन अधिकारी श्री वरुडे, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) श्रीमती पुष्पा पवार, जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, कार्यक्रम व्यवस्थापक एस.आर. देवडे यांच्यासह सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, रोहयोअंतर्गत जिल्ह्यात अपूर्ण असलेली सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. तसेच मजुरांना त्यांचा मोबदला अदा करण्याप्रसंगी नाकारण्यात आलेल्या एफटीओ बाबत सर्व संबंधितांनी तातडीने कारवाई करण्यात येऊन मजुरांची मजुरी तातडीने अदा करण्यात यावी. सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी समृध्दी बजेट वेळापत्रकाप्रमाणे तयार करण्याबरोबरच भौगो‍लीक प्रणालीद्वारे प्रत्ये क ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्यात यावेत. मजुरांना विहित मुदतीत मजूरी अदा होईल, यादृष्टीने नियोजन करत मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीामद्वारे (MMS) सुरु असलेल्याो कामांवरील मजूरांची दैनंदिन उपस्थिती घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिल्या.

यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर यांनी रोहयोअंतर्गत कामांची प्रलंबित जिओ टँगिग तातडीने पुर्ण करुन घेण्यात यावी. तसेच 60:40 प्रमाणे कसे राखता येईल, याबाबतही उपस्थित अधिकाऱ्यांना मागदर्शन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.