भेसळयुक्त पदार्थावर करडी नजर ठेवा - जिल्हाधिकारी विमला आर.

0 झुंजार झेप न्युज

भेसळयुक्त पदार्थावर करडी नजर ठेवा - जिल्हाधिकारी विमला आर.

नागपूर दि.27 : दिवाळी सणासूदीच्या काळात मिठाईच्या दुकानदारांवर करडी नजर ठेवून भेसळ करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करावी. दिवसेंदिवस वाढत्या तेलाच्या किमती त्यातच भेसळ यामुळे सामान्य नागरिकांना त्रासला आहे. यासर्व बाबींचा गंभीरतेने विचार करुन कठोर पावले उचलावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिल्या. 

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालात महाराष्ट्र ग्राहक पंचायत विदर्भ प्रांतचे अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, सदस्य कल्पना तिवारी, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, बी.एम तायडे, वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक विजय बनाफर, जिल्हा ग्राहक परिषद सदस्य ज्ञानेशवर चौधरी उपस्थित होते तर उपसंचालक मधुकर रामटेके, सहसंचालक कृषी विभागाचे अरविंद उपरीकर, अभय देशपांडे, प्रादेशिक उपपरिवहन कार्यालयाचे खंडेराव देशमुख, प्रशांत लांजेवार,मिलींद शेंडे आभासी प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. 

महावितरणने तक्रार नोंदविण्याचे ठिकाण, नाव व दुरध्वनी क्रमांक वीज देयक भरणा केंद्र व इतर महत्वाच्या ठिकाणी ठळक अक्षरात प्रसिध्द करावे, जेणेकरुन ग्राहकांना तक्रार योग्य ठिकाणी नोंदविण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांना लवकरच ओळखपत्र देण्यात येईल. रस्त्यावरील टपरीवर विकण्यात येणार पदार्थ गुणवत्तापुर्ण आहेत काय ? याबाबत अन्न व औषधी विभागाने तपासणी करुन दोषीवर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर बेकरीमधील पदार्थांची तपासणी करावी. 

गोरगरीबांना अज्ञान व जनजागृतीच्या अभावाने आरटीई कायद्यांतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी पाल्यांना शाळेतील प्रवेशास मुकावे लागते. याबाबत शाळेतील ठळक भागात आरटीईसाठी असलेल्या जागांचा तपशिल प्रसिध्द करण्याचे शिक्षण विभागांनी सर्व शाळांना कळविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

शाळा, महाविद्यालयातील स्कुल बसेच नियमबाहय भाडे घेतात. त्यांचा त्रास पालकांना होत असल्याचे सदस्यांनी सांगितले असता नियमानुसार भाडे निश्चितीचे पत्र प्रादेशिक उपपरिवहन विभागाने शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांना पत्र देण्याच्या सूचना दिल्या. शहरात वृध्दांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे चालतांना होणाऱ्या त्रासाबाबत सदस्यांनी विचारणा केली असता याबाबत पोलीस विभाग व महापालिका यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्न लवकरच सोडविण्याचे जिल्हाधिकारी सांगितले.  

यावेळी भेसळयुक्त 58 लाखाचे तेल जप्त करुन कारवाई करण्यात आली. वजन मापे विभागाने आतापर्यंत 10 दुकानदारांवर कारवाई करण्यात आल्याचे सदस्यांनी सांगितले. कोरोना महामारीत वेगवेगळ्या किंमतीचे मास्क व सॅनिटाईझर विकण्यात आल्याचे निदर्शनात आणून दिले. याबाबत तपास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्राहक न्याय या पुस्तकाचे विमोचन जिल्हाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.