स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता प्लास्टीक मुक्तीसाठी जनजागृती

0 झुंजार झेप न्युज

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता प्लास्टीक मुक्तीसाठी जनजागृती

हिंगोली,दि.27 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि जायंटस वेलफेअर ग्रुप, हरी ओम योग ग्रुप, योग विद्याधाम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा व प्लास्टीक एकत्र करुन नगर परिषदेच्या घंटागाडीमध्ये टाकून परिसर स्वच्छ करण्यात आला. 

यावेळी नेहरु युवा केंद्राचे अधिकारी आशिष पंत व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्लास्टीकचे गंभीर परिणाम या विषयावर मार्गदर्शन व जनजागृती केली. 

याप्रसंगी डॉ. संजय नाकाडे, गोविंद झुनझुनवाला, डॉ. सूर्यकिरण, डॉ.कुमावत, डॉ. श्रीधर कंदी, रत्नाकर महाजन, संजय भन्साळी, संजय उहान, सुदर्शन महाजन, काशिनाथ दराडे, शिवाजी पद्मने तसेच नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक प्रविण पांडे, संदीप शिंदे, नामदेव फरकंडे व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.