गोधन नष्ट करणारे अवैध कत्तलखाने बंद करा. अखिल भारतीय गो - रक्षा समिती ची मागणी
पैठण : (तालुका प्रतिनिधी)पैठण तालुक्यातील मौजे विहामांडवा गटात विनापरवाना चालणाऱ्या कत्तलखान्या सह गो-मातेस हानी पोहचवणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय गो-रक्षा समितीचे विहामांडवा गटाचे सर्कल अध्यक्ष विशाल आवारे व सर्कल सचिव दामोधर कोरटकर यांनी तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून श्री राजू शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, पैठण तालुक्यातील मौजे विहामांडवा गटातील नवगाव येथे विनापरवाना कत्तलखाना चालू आहे तसेच या गटातील विहा मांडवा ,चौंडाळा , चिंचाळा, मिरखेडा ,केकत जळगाव, हिरडपुरी, नवगाव आदी गावातील गो- मातेस हानी पोचवली जाते त्यांना क्रूरपणे जखमा केल्या जातात. ती गोमाता आजारी पडली की तिची रवानगी याच गटातील नवगाव येथील विनापरवाना चालणाऱ्या कत्तलखान्यात करण्यात येते किंवा पैठण तालुक्या शेजारील अंबड तालुक्यातील भांबेरी येथील कत्तलखान्यात करण्यात येते एकीकडे आपण गो-माता म्हणतो तिची अशी दुर्दशा झालेली बघावा लागत आहे.
तेव्हा आपण या प्रकरणी त्वरित लक्ष घालून हा प्रकार आठ दिवसात थांबवा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर गो- रक्षा समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी असा इशारा समिती च्या वतीने देण्यात आला या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त , जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण तहसीलदार पैठण सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पाचोड तालुका पैठण यांना देण्यात आल्या आहेत.
