लायन्स क्लब नवी मुंबई यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन

0 झुंजार झेप न्युज

लायन्स क्लब नवी मुंबई यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन

नवी मुंबई,दि.23 : येथील पनवेल रेल्वे स्थानकावर भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नेत्रतपासणी, सामान्य तपासणी त्याचप्रमाणे अनेकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले.

या शिबिराला पनवेल रेल्वे विभागानेही सहकार्य करीत शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिली. नायर रुग्णालयाच्या वतीने प्रगती राजेश सोंडे हिने नेत्रतपासणी शिबिर घेतले. याचा फायदा अनेकांनी घेत आपले डोळे तपासून घेतले. या तपासणीत ज्यांना नेत्रविकार आढळून आला अशा रुग्णांना पुढील उपचार करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने या शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहन आवाहन करण्यात आले होते. त्याला अनेकांनी प्रतिसाद दिला. तसेच अपोलो रुग्णालय व नवी मुंबई मनपाच्या रुग्णालयाने ही या शिबिरात भाग घेतला होता. लायन्स क्लब नवी मुंबई यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.