भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांना मातृशोक

0 झुंजार झेप न्युज

भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांना मातृशोक

पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टी वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांना मातृशोक झाला आहे. श्रीमती लक्ष्मीबाई नारायण मोढवे-पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

अतिशय कष्टाने त्यांनी मोढवे-पाटील परिवारामधील पाच मुलांचा सांभाळ केला. अलीकडेच त्यांनी नवीन वास्तूचे निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने मोढवे-पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या पाठीमागे पाच मुले, सून नांतवडे आणि भाऊबंद नातेवाईक, असा मोठा परिवार आहे. अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी ४ वाजता सिनानदी तीरावर होणार आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा महेश लांडगे तसेच माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्व. लक्ष्मीबाई मोढवे-पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.