विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम आज वार्डनिहाय मतदारयादी वाचन

0 झुंजार झेप न्युज

विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम आज वार्डनिहाय मतदारयादी वाचन

रत्नागिरी,दि.22 : जिल्हयात सुरु असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम 2022 अंतर्गत उद्या 23 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हयात सर्वत्र मतदार यादी तपासून घ्यावीत असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डा. बी.एन. पाटील यांनी केले आहे.

जिल्हयात असणाऱ्या सर्व नगरपंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात वार्डनिहाय वाचन होईल. यावेळी सर्वच ठिकाणी बीएलओंची उपस्थिती असेल. यादीतील नाव व केंद्र तपासणी तसेच नाव नसेल तर नव्याने नोंदणी, काही प्रकरणात यादीतून नाव वगळणे आदिंबाबतचे सर्व प्रकारचे अर्ज देखील यावेळी उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

भारत सरकार निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात मतदारांना ऑफलाईन खेरीज थेट ऑनलाईन पर्याय देखील उपलब्ध आहेत.

मतदार नावनोंदणीसाठी अर्ज नमुना क्र. 6, अनिवासी भारतीयाचे नाव नोंदविण्यासाठी नमुना 6 अ, कोणत्याही कारणाने नाव वगळणीसाठी नमुना 7, नावात किंवा इतर तपशीलात दुरुस्तीसाठी नमुना 8 आणि एकच मतदार संघात निवासस्थान स्थानंतर असल्यास नमुना 8-अ भरता येतात.

उद्या होणाऱ्या या कार्यक्रमात मतदारांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.