डॉ. प्रवीण घोडेस्वार यांना ‘फिरत्या चाकावरती’ या सदरासाठी लाडली मिडिया पुरस्कार प्रदान

0 झुंजार झेप न्युज

डॉ. प्रवीण घोडेस्वार यांना ‘फिरत्या चाकावरती’ या सदरासाठी लाडली मिडिया पुरस्कार प्रदान

मुंबई / नाशिक : नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामजिकशास्त्रे विद्याशाखेचे प्र. संचालक आणि सावित्रीबाई फुले अध्यासनाचे समन्वयक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांना नुकताच ‘लाडली मिडिया’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. दैनिक दिव्य मराठीच्या ‘मधुरिमा’ या साप्ताहिक पुरवणीत २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘फिरत्या चाकावरती’ या सदरासाठी हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे स्वतंत्र पत्रकार फेय डिसुझा होते तर United Nation’s Population Forum च्या श्रीराम हरिदास यांची विशेष उपस्थिती होती.

वाहन चालकाचा व्यवसाय करून आपली उपजीविका करणाऱ्या देशभरातल्या स्त्रियांच्या यशोदायी संघर्षकथा या सदरातून मांडण्यात आल्या आहेत. Population First, United Nation’s Population Forum आणि भारतातील नॉर्वेचे दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने लिंगभाव संवेदनशीलता निर्माण करणाऱ्या वार्तांकन आणि लेखनासाठी विविध वर्गवारीत हे पुरस्कार गेल्या १० वर्षांपासून देण्यात येतात. पुरस्काराचे यंदाचे हे ११ वे वर्ष असून यावर्षी १० भाषांमधल्या ९८ प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आलं आहे . 

डॉ. प्रवीण घोडेस्वार यांच्या या यशाबद्दल मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इ.वायुनंदन, माजी संचालक आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. रमेश वरखेडे,कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि विद्यापीठातल्या सहकाऱ्यांनी अभिनंदन केलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.